बांधकाम
- मुख्य बाजारातील तथा उपबाजारातील चालू असलेल्या सर्व बांधकामावर पाहणी करणे; कॉन्टक्टरची बिले आर्किटेक्टचे योग्य त्या शिफारसीप्रमाणे अदा करणे बाबत नोटसिटसह सादर करणे; आर्किटेक्टची बिले अदा करणे बाबत कार्यवाही करणे; बांधकाम खर्चाचा हिशोब ठेवणे; बांधकामाचे मंजुर खर्चमर्यादेचे तुलनेत प्रत्यक्ष होत असलेल्या बांधकाम खर्चाचा वेळोवेळी अहवाल सादर करणे.
- सचिवांचे सुचनेनुसार / सल्यानुसार करावयाचे बांधकामाची नोटसिट सादर करणे.
- आर्किटेक्टकडून नियोजित बांधकामाचे प्लॅन व इस्टिमेटस् तयार करून घेणे.
- आवश्यक्तेनुसार सचिवाचे सुचनेनुसार बांधकाम उपसमितीची सभा बोलाविणे संबंधीची कार्यवाही करणे; सभेत विशयांकित कागदपत्रे सचिवाकडे सादर करणे, करावयाचे बांधकामास 12 (1) चे तरतुदीरुसार खात्याकडून तसेच नगर परिशद/ ग्रामपंचायत कडून मंजुरी घेणे बाबत आवश्यक ते प्रस्ताव पाठविणे, त्या संबधी पाठपुरावा करणे; बांधकामाकरिता कर्ज मागणी प्रस्ताव सादर करणे व पाठपुरावा करणे; कलम 12 (1) चे मंजुरी प्राप्त असलेली, करावयाचे बांधकामाचे निवीदापत्र, आर्किटेक्टचे सल्याने /सहाय्याने तयार करणे, सचिवाचे सल्याने बांधकामाची जाहिरात देणे, ई-निविदा बोलविणे इत्यादि कामाबाबत नोटसिट लिहीणे व कार्यवाही करणे.
- बाजार समितीच्या जुन्या इमारती ज्या दुरूस्तीवर आलेल्या आहे, त्याची नियमानुसार टिपणी लिहुन सदर इमारतीची डागडुगी व दुरूस्ती करून घेणे.