कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर ची स्थापना सि. पी. अॅड बेरार अॅक्ट 1935 चे तरतूदी नुसार दि. 12 /05/1960 ला झाली असून प्रत्यक्ष कामकाजास दि. 01/01/1968 पासून सुरवात झाली आहे. सध्या स्थितीत बाजार समितीचे कार्यक्षेत्रात चंद्रपूर व बल्लारपूर तालूक्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर शहर सह एकुण 138 गावे आहेत.
शेतमालाची ई-लिलाव पध्दतीने विक्री, शेतमालाची साठवणूक, योग्य मोजमाप, चुका-याची रक्कम त्वरीत देण्याची व्यवस्था हयावर नियंत्रण ठेवून शेतक-यांचे जास्तीत जास्त हित साधण्याचा उद्देश् समोर ठेवून बाजार समिती प्रगती पथावर कार्यरत आहे. बाजार समितीने सर्व प्रकारचे धान्य, फळे, भाजी, कापूस, लाल मिरची (सुखी), गुरे व ढोरे, अंडे, मासोळी, कोंबडया इत्यादी शेतमालाचे नियमन केलेले आहे. मुख्य बाजार स्थळ रामनगर, चंद्रपूर येथे स्वतःचे मालकीचे जागेवर असून बाजार स्थळाकरीता 6.60 हेक्टर शासकीय जमीन विकत घेतली आहे.
वरील व्यवस्थेशिवाय यार्डमध्ये शेतक-यांचे सोईकरीता दोन शेतकरी निवास बांधलेला असून, त्यामध्ये 20 बेडस्ची व्यवस्था केलेली आहे. यार्डवर विहिर, टयुबवेल, पाणी साठवणुकरीता 30000 लिटर क्षमतेची 1 टाकी (सिमेंट), 2000 लिटर क्षमतेच्या 4 टाक्या (प्लास्टीक),सिमेंट कॉक्रीट रोड, गोदाम, लिलाव शेड, वाटर कुलर, ईत्यादी. बाजार समिती ‘अ’ वर्ग घोषीत असून, वर्ष अखेर एकुण 21 कर्मचारी कार्यरत आहे. बाजार समितीचे विकासाचे दृष्टिने सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. दरवर्षी बाजार समितीचे उत्पन्नात वाढ होत आहे.
बाजार समिती मुख्य बाजार स्थळ, रामनगर, (चंद्रपूर) येथे शेतक-यांचे हिताचे दृष्टिने गत 31 वर्षापासून शेतमाल तारण योजना यश्स्वीपणे राबवित आहे. त्यास दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सदर योजनेत धान, चना, तुरी, सोयाबिन, मुंग ईत्यादी शेतमालाचा समावेश आहे. आवश्य्कते प्रमाणे शेतमाल सुरक्षित राहण्याचे दृष्टिने धुरिकरण करण्यात येते. तसेच शासनाचे धान्य् शेतमालाची हमीभाव योजना राबविण्यात येत असुन, शेतमाल खरेदी करण्यात येत आहे. चंद्रपूर बाजार समिती ही नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देउन काम करत आली आहे व येणा-या बदलांना सामोरे जाऊन निश्चीतच शेतकरी हित जपण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर चे दुय्य्म बाजार
दुय्य्म बाजार कोठारी
कोठारी येथे दुयम बाजार दि. 22 एप्रिल 1992 ला जाहीर झाला आहे. येथे जागा भाडयाने घेतलेली आहे. लाल मिरची (सुखी) व धान्य बाजारचे दृष्टिने तात्पूरत्या सोई केल्या आहे.दुय्य्म बाजार पांढरकवडा
पांढरकवडा येथे दुयम बाजार दि. 23 मार्च 1989 ला जाहीर झाला आहे. येथे स्वतःचे मालकीचे 1.60 हेक्टर जागा आहे. कापूस व धान्य बाजारचे दृष्टिने आवश्य्क त्या सोई उपलब्ध केलेल्या आहे. कार्यालयीन ईमारत - कम गोदाम, पाण्याचे टाके, विहीर, बोरींग, रस्ते, ग्रामीन गोदाम योजने अंतर्गत 500 मे. टन गोदामचे बांधकाम केलेले आहेत.एमआयडीसी दाताळा रोड येथे रासबिहारी अॅग्रो प्रोसेसिंग, सोसायटी अॅग्रो प्रोसेसिंग धानोरा, श्रेयांश सिंटेक्स प्रा लि. पांढरकवडा व रिध्दी-सिध्दी कॉटन असे चार जिनिंग आहेत.