बाजार समिती मुख्य बाजार स्थळ, रामनगर, (चंद्रपूर) येथे शेतक-यांचे हिताचे दृष्टिने गत 31 वर्षापासून शेतमाल तारण योजना यश्स्वीपणे राबवित आहे. त्यास दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सदर योजनेत धान, चना, तुरी, सोयाबिन, मुंग ईत्यादी शेतमालाचा समावेश आहे. आवश्य्कते प्रमाणे शेतमाल सुरक्षित राहण्याचे दृष्टिने धुरिकरण करण्यात येते. तसेच शासनाचे धान्य् शेतमालाची हमीभाव योजना राबविण्यात येत असुन, शेतमाल खरेदी करण्यात येत आहे. चंद्रपूर बाजार समिती ही नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देउन काम करत आली आहे व येणा-या बदलांना सामोरे जाऊन निश्चीतच शेतकरी हित जपण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.
