शेतमाल तारण योजना
- शेतमाल तारणे योजनेचे प्रस्ताव तयार करून पाठविणे; मंजुर आदेशातील मार्गदर्शक सुचनेनुसार तारण योजनेत आलेला शेतमाल स्विकारणे; शेतमालाचे दर्जा/योग्यते नुसार त्यास ग्रेड लावणे; मोजमाप करून घेणे; पोत्यावर लॉट नंबर लिहीणे; ग्रेड प्रमाणे मालाची थप्पी लावून घेणे; नंतर चालू बाजार भावाप्रमाणे शेतमालाची किंमत लावणे; नियमानुसार मालाचे पेरेपत्रकासह 7/12, आवष्यक नमुन्यामध्ये अर्ज; करारनामा व इतर माहिती शेतक-यांकडून घेणे; तारण कर्जाचे धनादेश तयार करणे; त्यावर कार्यालयीन मंजुरी घेणे; धनादेश शेतक-यांना देणे
- तारण मधील शेमालाचा सर्व हिषोब ठेवणे; आवश्यक ते सर्व रजिस्टर ठेवणे; दैनिक स्टॅकची नोंद घेणे; तसेच उपबाजारपेठांवरील तारणयोजनेत स्विकारलेल्या शेतमालाचा अहवाल मागविणे.
- साप्ताहिक माहिती तक्ते पणन मंडळास /मा.जि.उ.नि. कार्यालयास सादर करणे; पणन मंडळाकडून तारण कर्ज हप्त्याची मागणी करणे
- तपासणी अधिका-यांना रेकॉर्ड दाखविणे;स्टॉक दाखविणे;योजनेची प्रसिध्दी करणे; शेतक-यांना माहिती समजावून सांगणे; हया व्यतिरिक्त शेतमालाची साठवणूक, जोपासना योग्य प्रकारे करणे; योग्य वेळी धुरीकरण करणे; दैनिक किर्द लिहणे.
- हमाल, मापारी हयांची हमाली व मापाईचे बिले देणे. बारदान्याचा हिशोब ठेवणे, व तारण योजने संबंधीची इतर सर्व अनुशंगीक कामे सांभाळणे. तारण योजनेची प्रसिध्दी करणे, प्रचार करणे व शेतक-यांना सदर योजने बाबत गावोगावी जाऊन माहिती देणे.