प्रवेश गेट वर येणा-या गुरांचे वाहनाची नोंद वाहन प्रवेश बुकात घेणे. व त्याना गेटपास देणे. संपूर्ण गुरेबाजारावर नियंत्रण ठेवणे; वसूल झालेली बाजार फी, देखरेख फी, साक्षांकन फी, गुरांची प्रवेश फी त्याच दिवशी किवा दुसरे दिवषी लेखा विभागात जमा करणे. तसेच गुरांची आवक व विक्री किंमत (प्रत्येक जनावरांची वेगवेगळी द्यावी जसे-गोरे, बैल, गायी, म्हैस, रेडे, षेळया, मेढया, इत्यादि) मासिक गोशवारा तयार करून स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदवावा; रेकॉर्ड प्रमाणे झालेल्या वसुलीचा व लेखा विभागाकडे जमा केलेल्या वसुलीचा मासिक /वार्षीक पडताळा करणे वेळोवेळी अहवाल सचिवाकडे सादर करणे.