उपबाजार पांढरकवडा अंतर्गत येणा-या कापुस केंद्रावरील संपुर्ण साफसफाई, लोकांना तसेच बैलांना पिण्याचे पाणी, प्रकाशाची व्यवस्था, इत्यादि व्यवस्था ठेवणे; कापुस खरेदी सुरू होण्याचे दृश्टिने आवश्यक ती संपुर्ण पुर्व तयारी करणे; कापुस खरेदी सुरू करणे बाबत योग्य तो पाठपुरावा करणे; सचिवाचे मार्गदरर्शनाखाली आवश्यक ते रोंजदारी कर्मचारी/ मजूर लावणे; कापुस गाडी प्रवेश रजिस्टर लिहणे; नियम व पध्दतीनुसार प्रवेश पत्रिका (टोकण बुक) लिहणे; यार्डवरील कापुसाच्या गाडया पध्दतशीर लावणे; कापुस वांदयाची नोंद करणे; वांदा उपसमितीची सभा बोलाविणेची कार्यवाही करणे; सभावृत्त लिहणे; वांदा उपसमितीचा निर्णय सबंधीतास कळविणे; इतर सर्व रेकॉर्ड ठेवणे; आवकेचा दैनिक आढावा मुख्यालयास कळविणे; इतर आवष्यक ती सर्व व्यवस्था ठेवणे. बाजार क्षेत्रात होणा-या कापूस खरेदी वरील बाजार फी व देखरेख फी वसुलीची कार्यवाही करणे; वसुलीची रक्कम लेखा विभागाकडे जमा करणे व संबंधीत रेकॉर्ड ठेवणे; थकीत असलेल्या बाजार फी चे वसुली संबंधाने पाठपुरावा करणे.