भाजीबाजाराचे गेट वर येणा-या वाहनातील शेतमालाची नोंद वाहन प्रवेश बुकात घेणे. व भाजी या शेतमालाची नोंद आवक या रजिस्टर मध्ये घेणे तसेच बाजारभाव ची बाजारभाव या रजिस्टर मध्ये घेणे. भाजी अडत्या/व्यापारी यांचे बिलबुक प्रमाणित करून देणे. फळे बाजारातील शौचालय संकुल, पिण्याचे पाण्याची व्यवस्था पाहणे, विद्युत व्यवस्था पाहणे, व काही नादुरूस्त असल्यास सुरळीत चालु नसल्यास त्वरित लेखी कार्यालयास माहिती द्यावी. अडते/व्यापारी हयांनी प्रमाणित केलेल्या बिलावर बाजर फी व देखरेख फी वसुल करण्यात यावी. प्रत्यक्ष बाजर फीरून बाजारभाव पडताळुन बघावे. वसुल झाली बाजार फी, देखरेख फी व वाहन प्रवेष फी त्याच किंवा दुस-या दिवसी लेखा विभागात जमा करूण रितसर जमापावती घ्यावी. व रेकॉर्ड ला लावावी. भाजी बाजारातील संपुर्ण रेकॉर्ड जसे बिलेबुके, कम्प्युटरराईज बिले, नंबरनुसार लावुन बाजार समिती बाजार उपविधीनुसार साभांळुन ठेवावी. अडते/व्यापारी कडुन गहाळ बिल घेणे, व बाजर फी वसुल करणे, खरेदीदाराची शेतमालाची गाडीतील षेशपावतीनुसार शेतमालाचे तपासणी करून मार्केट यार्ड चे बाहेर जाण्यास परवानगी द्यावी. भाजी बाजाराची साफसफाई करून घेणे व निघणारा सडीक कचरा ट्राली टाकण्यास सुचना देणे.