चिचपल्ली येथे दुयम बाजार दि. 4 जुलै 2000 ला जाहीर झाला आहे. त्यानुसार खरेदी केलेल्या शेतमालावर बाजार फी वसुल केली जाते.
:- पांढरकवडा येथे दुयम बाजार दि. 23 मार्च 1989 ला जाहीर झाला आहे. येथे स्वतःचे मालकीचे 1.60 हेक्टर जागा आहे. कापूस व धान्य बाजारचे दृष्टिने आवश्य्क त्या सोई उपलब्ध केलेल्या आहे. कार्यालयीन ईमारत - कम गोदाम, पाण्याचे टाके, विहीर, बोरींग, रस्ते, ग्रामीन गोदाम योजने अंतर्गत 500 मे. टन गोदामचे बांधकाम केलेले आहेत. एमआयडीसी दाताळा रोड येथे रासबिहारी ॲग्रो प्रोसेसिंग, सोसायटी ॲग्रो प्रोसेसिंग धानोरा, श्रेयांश सिंटेक्स् प्रा लि. पांढरकवडा व रिध्दी-सिध्दी कॉटन असे चार जिनिंग आहेत.
कोठारी येथे दुयम बाजार दि. 22 एप्रिल 1992 ला जाहीर झाला आहे. येथे जागा भाडयाने घेतलेली आहे. लाल मिरची (सुखी) व धान्य बाजारचे दृष्टिने तात्पूरत्या सोई केल्या आहे.
उपबाजार गंजवार्ड चंद्रपूर महानगर पालीकेच्या जागेवर दररोज भरविण्यात येत असुन, त्यावर बाजार समिती, चंद्रपूर चे नियंत्रण आहे.
