कार्यालयात येणा-यास पत्रांची योग्य ती नोंद आवक रजिस्टरमध्ये करणे. 2. सदर पत्रे संबंधीत विभागाकडे सोपविणे व त्याबाबतची रजिस्टरवर विभाग प्रमुखाची स्वाक्षरी घेणे; तसेच कार्यालयातून ईतर कार्यालयास पाठवावयाचे पत्रावर जावक रजिस्टर मध्ये योग्य ती नोंद करणे व संबंधीत कार्यालयास पाठविण्याची कार्यवाही करणे; पोष्टाचे तिकीटांचा हिशोब ठेवणे व लेखापालास दाखविणे.
- धान्य लिलाव सुरु करणे, काटे सुरु करणे, वेळोवेळी काटयावर देखरेख ठेवणे, हमाल मापारींची हजेरी ठेवणे, कामाची पाळी लावणे,लिलावात सौदापट्टी लिहणे, व सौदापट्टी रजिस्टर लिहणे, त्यावरून काटापट्टीतील नोंदीची पडताळणी करणे, व तपासणी करणे.
- अहवाल वेळोवेळी सचिवाकडे सादर करणे
- लिलाव झाल्यानंतर बाजार भावाची माहिती, सचिव/सहाय्यक सचिव/विपणन व सांख्यिकी विभाग/संगणक विभाग/ संबंधीत वृत्तपत्रात देणे. लाल सुखी मिरची सौदापट्टी फाडणे, काटे करून घेणे.
- उपबाजार पांढरकवडा अंतर्गत येणारी सर्व कामे सांभाळणे व वेळोवेळी सचिवाकडे अहवाल सादर करणे. प्रतिमाह 5 तारखेपुवी जमाखर्चाचे हिशोब मुख्यालयास सादर करणे.
- बाजार फी वसुल करणे. व सदर वसुल लेखा विभागात भरणा करणे.
- उपबाजार कोठारी अंतर्गत येणारी सर्व कामे सांभाळणे व वेळोवेळी सचिवाकडे अहवाल सादर करणे. प्रतिमाह 5 तारखेपुर्वी जमाखर्चाचे हिशोब मुख्यालयास सादर करणे.
- बाजार फी वसुल करणे. व सदर वसुल लेखा विभागात भरणा करणे.
- उपबाजार चिचपल्ली अंतर्गत येणारी सर्व कामे सांभाळणे व वेळोवेळी सचिवाकडे अहवाल सादर करणे. प्रतिमाह 5 तारखेपुर्वी जमाखर्चाचे हिषोब मुख्यालयास सादर करणे.
- बाजार फी वसुल करणे. व सदर वसुल लेखा विभागात भरणा करणे.
उपबाजार गंजवार्ड अंतर्गत येणारी सर्व कामे सांभाळणे व वेळोवेळी सचिवाकडे अहवाल सादर करणे. दैनिक आवक व बाजार भाव मुख्यालयास सादर करणे.
- शेतकरी निवासातील, गादया, चादरी, बेडशीट, उश्या, लोखंडी पलंग, इत्यादि माहितीच्या नोंदी ठेवणे, साफसफाई व धुलाई करणे, शेतकरी निवासात थांबणा-या शेतक-याची, व्यापा-यांची, इतर बाजार कार्यकर्त्याच्या नोंदींचे अद्यावत रजिस्टर ठेवणे.
- वसुल केलेली निवास शुल्क लेखा विभागाकडे जमा कररून त्याची पावती घेणे, वेळोवेळी अहवाल सादर करणे.
माहिती अधिकार नियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्जावर माहिती अधिकार नियम 2005 नुसार कारवाही करणे.
बाजार समितीचे वाहनाची देखभाल दुरूस्ती, डीझल, इधंनाचा हिषोब व वाहणा संबधी संपुर्ण रेकॉर्ड ठेवणे. विमा, व सर्व्हीसींग वेळोवेळी करून घेणे.
-ज्यांची डयुटी वे-ब्रिज काटा करण्या करिता लावलेली आहे. त्यानी शेतमालाचा वे-ब्रिज काटा करूण रक्कम वसूल झालेली लेखापाला कडे भरणा करणे.
कार्यालयातील संपुर्ण सचिवांचे केबिन, लेखापालाची केबिन तसेच इतर केबिन, कार्यालय, सभागृह, सभापती कार्यालय व ॲन्टी चेंबर, कार्यालयाचे किचन व सभागृहाच्या बाजुची किचन ची साफसफाई, तसेच शैचालय व मुतारी रोज रोजदांरी मजुरांकडुन साफ करून घेणे, कार्यालयातील तथा नविन व जुने शेतकरी निवासमधील साहीत्य खरेदी व दुरूस्ती, संपुर्ण लाईट, पंखे, वाटर फिल्टर, कुलर, ए.सी. आलमारी, टेबल खरेदी करणे करिता पुर्वखर्चाची टिपणी लिहुन सदर मंजुर टिपणी नुसारच कामे करणे व त्यामध्ये काही बिघाड आल्यास दुरूस्ती करूण घेणे. कार्यालयाचे वरिल माळयावरचे षेड साफसफाइ करून घेणे.
बाजार समितीला प्राप्त होणारे अडते/व्यापा-यांचे विद्युत बिले अडते/व्यापारी यांना पोहचवुन देणे. तसेच कार्यालयीन विद्युत बिलाची टिपणी लिहुन बिल भरणा करणे.
मार्केट यार्ड मधुन गाडी बाहेर जाताना ना हरकत प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. सदर गाडी निट तपासुन सदर शेतमालाची शहानिशा करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावी. ना. हरकत प्रमाणपत्र दिलेल्या बुकाची नोंदी ठेवण्याची जबाबदारी संबधित विभागाची राहिल.