- मार्केट यार्डवरील भाजीबाजार, फळेबाजार, धान्यबाजार व बैलबाजार येथील पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणे, गुरांचे पाण्याची व्यवस्था करणे
- मार्केटयार्ड वरिल बोरवेल अद्यावत स्थितीत ठेवुन पाणी पुरवठा व्यवस्थीत करणे, पिण्याचे पाण्याची टाकी वेळोवेळी साफ करणे.
- यार्डवरील शौचालय संकुलाची व्यवस्था पाहणे,
- कार्यालयीन इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटी करणे.
- मार्केट संरक्षणाचे दृष्टिने कुपंन दुरूस्त करणे, सुरक्षा रक्षकाची डयुटी लावणे, निविदा मागविणे
- सडिक कचरा व्यवस्थापन निविदा मागविणे, रजिस्टर मेन्टेन करणे,
- रोजंदारी मजुरांचे हजेरीपट ठेवुन त्यांना मंजुर व्हावचर वर अदा करणे.
- संपुर्ण मार्केट यार्ड साफसफाई करणे,
- रोजंदारी मजुर व सुरक्षागार्ड आवष्यकते नुसार कमी जास्त करून काम करून घेणे,
- कार्यालयीन विद्युत व्यवस्था बघने. वेळोवेळी वरील सर्व बाबी संबंधाने आवश्यक त्या नोटसिट्स लिहून पूर्वखर्चास मंजुरी घेणे व काम करून घेणे.
- मार्केट यार्ड वरील सर्व झाडांची देखभाल करणे कार्यालय आवारातील बागबगीच्याची साफसफाई व लॉन, मैदी छटाई करणे पाणी देणे बाबत व देखभाली व्यवस्था ठेवणे
जूने (कालबाहय) रेकॉर्ड सांभाळणे; त्याची रजिस्टरवर नोंद ठेवणे.
- कार्यालयातील विपणन/सांख्यिकी /तारण /अनुज्ञाप्ती व इतर विभागातील रेकॉर्ड/ नमुने /आराखडे आवश्यक्तेनुसार नविन छपाई करणे बाबत आढावा घेवून छपाई बाबतची कार्यवाही करणे
- छापील साहित्य सांभाळणे; त्याची सविस्तर रजिस्टरवर नोंद घेणे व वितरण करणे;
- रेकॉर्ड छपाईचे बिले मंजुरीची कार्यवाही करणे. छपाई झालेली स्टेशनरी संबंधीत विभागाकडे पुर्णतः सुपुर्द करून पोच घेणे.
- बाजार समितीचे कार्यालय, फळेबाजार कार्यालय, भाजीबाजार कार्यालय, वे ब्रिज काटा, येथील संगणक यंत्रणेची संपुर्ण देखभाल व दुरूस्ती चे कामे करणे
- सदर काम कोटेशन, निविदा मागवुन वार्षीक दर मंजुर करून घ्यावे. व सदर कामाची टिपणी सह ठेवुन बिले अदा करावी.
- बाजार समितीचे प्रत्येक संगणकाची रजीस्टर मध्ये नोंद घेवुन त्यावर केलेल्या संपुर्ण खर्चाची माहिती अद्यावत ठेवणे.
- बाजार समितीमध्ये मार्केट यार्डवरिल मालमत्ता व कार्यालयीन मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टिने सि.सि.टि.व्ही. लावणे.
- सदर सि.सि.टि.व्ही. देखभाल करणे. त्यामध्ये बिघाड आल्यास ते दुरूस्त करणे.
- सदर वेब्रिज काटयाची देखभाल करणे. त्यामध्ये बिघाड आल्यास ते दुरूस्त करणे. सदर काटा पासिंग करणे.
- वे ब्रिज काटयावर शेतमालाचे वाहणाचा काटा करणे. व सदर काटा वसुली ची रक्कम त्याच दिवसी किंवा दुसरे दिवसी लेखाविभागात जमा करणे.
- स्टॉकची नोंदणी ठेवणे; सुव्यवस्था व हिषोब ठेवणे; त्याबाबतचे रजिस्टर ताब्यात ठेवणे
- वरिष्ठांचे सुचनेनुसार त्याचे वितरण करणे तथा परत घेणे.
बाजार क्षेत्रात परपेठेतुन आयात केलेल्या धान्याचे फेरविक्रीवरील बाजार फी व देखरेख फी वसुलीची कार्यवाही करणे; आवकेचे माहिती तक्ते मागविणे; वसुलीची रक्कम लेखा विभागाकडे जमा करणे व संबंधीत रेकॉर्ड ठेवणे; संपुर्ण अडते/व्यापा-यांचे वैयक्तीक खाते ठेवणे, वसुलीचा आढावा वेळोवेळी सचिवाकडे सादर करणे; परपेठेतून आयात झालेल्या धान्याची आवक, किंमत इत्यादि माहितीवर मासिक गोषवारा तयार करून, स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदविणे
उपबाजार पांढरकवडा अंतर्गत येणा-या कापुस केंद्रावरील संपुर्ण साफसफाई, लोकांना तसेच बैलांना पिण्याचे पाणी, प्रकाशाची व्यवस्था, इत्यादि व्यवस्था ठेवणे; कापुस खरेदी सुरू होण्याचे दृश्टिने आवश्यक ती संपुर्ण पुर्व तयारी करणे; कापुस खरेदी सुरू करणे बाबत योग्य तो पाठपुरावा करणे; सचिवाचे मार्गदरर्शनाखाली आवश्यक ते रोंजदारी कर्मचारी/ मजूर लावणे; कापुस गाडी प्रवेश रजिस्टर लिहणे; नियम व पध्दतीनुसार प्रवेश पत्रिका (टोकण बुक) लिहणे; यार्डवरील कापुसाच्या गाडया पध्दतशीर लावणे; कापुस वांदयाची नोंद करणे; वांदा उपसमितीची सभा बोलाविणेची कार्यवाही करणे; सभावृत्त लिहणे; वांदा उपसमितीचा निर्णय सबंधीतास कळविणे; इतर सर्व रेकॉर्ड ठेवणे; आवकेचा दैनिक आढावा मुख्यालयास कळविणे; इतर आवष्यक ती सर्व व्यवस्था ठेवणे. बाजार क्षेत्रात होणा-या कापूस खरेदी वरील बाजार फी व देखरेख फी वसुलीची कार्यवाही करणे; वसुलीची रक्कम लेखा विभागाकडे जमा करणे व संबंधीत रेकॉर्ड ठेवणे; थकीत असलेल्या बाजार फी चे वसुली संबंधाने पाठपुरावा करणे.
फळेबाजाराचे गेट वर येणा-या वाहनातील शेतमालाची नोंद वाहन प्रवेश बुकात घेणे. व फळे या शेतमालाची नोंद आवक या रजिस्टर मध्ये घेणे तसेच बाजारभाव ची बाजारभाव या रजिस्टर मध्ये घेणे. फळे अडत्या/व्यापारी यांचे बिलबुक प्रमाणित करून देणे. फळे बाजारातील शौचालय संकुल, पिण्याचे पाण्याची व्यवस्था पाहणे, विद्युत व्यवस्था पाहणे, व काही नादुरूस्त असल्यास सुरळीत चालु नसल्यास त्वरित लेखी कार्यालयास माहिती द्यावी. अडते/व्यापारी हयांनी प्रमाणित केलेल्या बिलावर बाजर फी व देखरेख फी वसुल करण्यात यावी. प्रत्यक्ष बाजार फीवरून बाजारभाव पडताळुन बघावे. वसुल झाली बाजार फी, देखरेख फी व वाहन प्रवेश फी त्याच किंवा दुस-या दिवसी लेखा विभागात जमा करूण रितसर जमापावती घ्यावी. व रेकॉर्ड ला लावावी. फळे बाजारातील संपुर्ण रेकॉर्ड जसे बिलेबुके, कम्प्युटरराईज बिले, नंबरनुसार लावुन बाजर समिती बाजार उपविधीनुसार साभांळुन ठेवावी. अडते/व्यापारी कडुन गहाळ बिल घेणे, व बाजर फी वसुल करणे, खरेदीदाराची शेतमालाची गाडीतील शेषपावतीनुसार शेतमालाचे तपासणी करून मार्केट यार्ड चे बाहेर जाण्यास परवानगी द्यावी. फळे बाजाराची साफसफाई करून घेणे व निघणारा सडीक कचरा ट्राली टाकण्यास सुचना देणे.
भाजीबाजाराचे गेट वर येणा-या वाहनातील शेतमालाची नोंद वाहन प्रवेश बुकात घेणे. व भाजी या शेतमालाची नोंद आवक या रजिस्टर मध्ये घेणे तसेच बाजारभाव ची बाजारभाव या रजिस्टर मध्ये घेणे. भाजी अडत्या/व्यापारी यांचे बिलबुक प्रमाणित करून देणे. फळे बाजारातील शौचालय संकुल, पिण्याचे पाण्याची व्यवस्था पाहणे, विद्युत व्यवस्था पाहणे, व काही नादुरूस्त असल्यास सुरळीत चालु नसल्यास त्वरित लेखी कार्यालयास माहिती द्यावी. अडते/व्यापारी हयांनी प्रमाणित केलेल्या बिलावर बाजर फी व देखरेख फी वसुल करण्यात यावी. प्रत्यक्ष बाजर फीरून बाजारभाव पडताळुन बघावे. वसुल झाली बाजार फी, देखरेख फी व वाहन प्रवेष फी त्याच किंवा दुस-या दिवसी लेखा विभागात जमा करूण रितसर जमापावती घ्यावी. व रेकॉर्ड ला लावावी. भाजी बाजारातील संपुर्ण रेकॉर्ड जसे बिलेबुके, कम्प्युटरराईज बिले, नंबरनुसार लावुन बाजार समिती बाजार उपविधीनुसार साभांळुन ठेवावी. अडते/व्यापारी कडुन गहाळ बिल घेणे, व बाजर फी वसुल करणे, खरेदीदाराची शेतमालाची गाडीतील षेशपावतीनुसार शेतमालाचे तपासणी करून मार्केट यार्ड चे बाहेर जाण्यास परवानगी द्यावी. भाजी बाजाराची साफसफाई करून घेणे व निघणारा सडीक कचरा ट्राली टाकण्यास सुचना देणे.
प्रवेश गेट वर येणा-या गुरांचे वाहनाची नोंद वाहन प्रवेश बुकात घेणे. व त्याना गेटपास देणे. संपूर्ण गुरेबाजारावर नियंत्रण ठेवणे; वसूल झालेली बाजार फी, देखरेख फी, साक्षांकन फी, गुरांची प्रवेश फी त्याच दिवशी किवा दुसरे दिवषी लेखा विभागात जमा करणे. तसेच गुरांची आवक व विक्री किंमत (प्रत्येक जनावरांची वेगवेगळी द्यावी जसे-गोरे, बैल, गायी, म्हैस, रेडे, षेळया, मेढया, इत्यादि) मासिक गोशवारा तयार करून स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदवावा; रेकॉर्ड प्रमाणे झालेल्या वसुलीचा व लेखा विभागाकडे जमा केलेल्या वसुलीचा मासिक /वार्षीक पडताळा करणे वेळोवेळी अहवाल सचिवाकडे सादर करणे.
बाजार यार्डवर (लिलावात) विक्री होणा-या लाल सुखी मिरची या शेतमालाच्या काटापट्टी ची संगणकात नोंद घेवुन सदर शेतमालाचे खरेदीवरील बाजार फी व देखरेख फी, वेळोवेळी ठरविण्यांत येणा-या पध्दतीप्रमाणे वसुलीची कार्यवाही करणे; वसुलीची रक्कम लेखा विभागाकडे जमा करणे; बाजार फी वसुलीचे; अडत्या/ व्यापा-यांकडून माहिती तक्ते घेणे; खाते निहाय रजिस्टर ठेवणे; वसुलीचा आढावा वेळोवेळी सचिवाकडे सादर करणे; शेतकरी/अडते/व्यापारी यांचे येणे चुका-याचे रक्कमेचा वेळोवेळी आढावा घेणे व सचिवाकडे सादर करणे; या संबंधीचा आवश्यक तो सर्व रेकॉर्ड ठेवणे.