महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम, 1963 तथा महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) नियम, 1967 चे नियम मध्ये नमुद केलेली, तसेच उक्त अधिनियम, नियम बाजार समितीचे उपविधी, अन्वये तथा शासनाचे खात्याचे विशेष आदेशान्वये / परिपत्रकान्वये नमुद केलेली सर्व कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे. तसेच सभापती/उपसभापती/प्रशासक/मुख्य प्रशासक यांनी दिलेल्या आदेशा नुसार कामे करणे.
- दैनिक किर्द लिहणे, संबंधीत लेखा पुस्तके तयार करणे
- संपूर्ण लेख्यांची /खात्याची ची माहिती ठेवणे
- बाजार समितीचे जमाखर्चपत्रके, उत्पन्नखर्चपत्रके, अंदाजपत्रके तयार करणे, (उपबाजारसह), अनुदान व इतर संबंधीत प्रकरणे तयार करणे; सर्व कार्यालयीन विभागाकडून वसूल झालेली रक्कम स्विकारणे बॅंकेत भरणा करणे; बॅकेंषी सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार करणे व इतर खाते पाहणे
- संबंधीत नोंदवहया ठेवणे व त्यामध्ये नियमित आवश्य्क त्या सर्व नोंदी घेणे; शासकीय /पणन मंडळ/ बॅंक/ इतर कर्ज हप्ते भरणे, लेखांची संबंधीत माहिती खात्यास सादर करणे; बाजार समितीचे उत्पन्नखर्च पत्रके, जमाखर्च पत्रके टॅली मध्ये टाकणे.
- बाजार समितीचे कार्यकारी मंडळाचे सभेचे सभा अहवाल ठेवणे.
- सभा बोलाविणे विषयी, विषयसुची तयार करून सचिव, सभापती/प्रशासक हयांची मंजूरी घेणे; तदनंतर सभा नोटीस काढणे; नोटीस संकलन करून ठेवणे सभेचे कामकाजात सचिवांना मदत करणे.
- आवश्यक त्या टिपणीनुसार वा सल्यानुसार सभावृत्त लिहणे; झालेल्या ठरावाची नक्कल संबंधीत विभागास कार्यवाही करिता देणे.
- बाजार क्षेत्रातील नियंत्रीत शेतमालाचे वैध/अवैध व्यवसाय करणा-या अडत्या/व्यापा-याचे आस्थापनेस भेट देवून दरमहा रेकॉर्डची तपासणी घेणे.
- तालुक्यातील सर्व प्रक्रीया उद्योगांना अनुज्ञाप्ती काढण्यांस बाध्य करणे. व अहवाल कार्यालयास प्रतिमाह तपासणीसह सादर करणे.
- कार्यक्षेत्रातील परपेठ शेतमाल विक्री करणा-या व्यापा-यांची तपासणी घेणे.
- नविन व्यापारी असल्यास अनुज्ञाप्ती काढण्यास नोटीस देणे.
कार्यालयास प्राप्त झालेल्या तपासणी अहवालावर सचिवांचे सुचनेनुसार कार्यवाही करणे.
- सर्व सामान्य पत्रव्यवहार हाताळणे, उपविधी दुरूस्ती प्रकरणे तयार करणे मंजुरी बाबत सादर करणे, पाठपुरावा करणे; अधिसुचना संबंधी प्रकरणे हाताळणे, त्यासंबंधाने पाठपुरावा करणे.
- बाजारपेठ प्रकरणे हाताळणे, त्यासंबंधाने पाठपुरावा करणे; षेतमाल नियमना संबंधीचे प्रकरणे हाताळणे, व त्यासंबंधाने पाठपुरावा करणे
- कार्यालयीन अनुषंगीक माहिती संबंधीत खात्यास सादर करणे
- पणन मंडळाचे/शासनाचे /संबंधीत खात्याचे शासकीय परिपत्रक व आदेश संकलीत करून ठेवणे, कायदयाचे पुस्तके ठेवणे
- वार्शिक प्रशासनिक अहवाल तयार करणे, करवून घेणे.
- लेखा दोश दुरूस्ती बाबत कार्यवाही करणे, करवून घेणे; बाजार समितीने वेळोवेळी हाती घेतलेले विविध उपक्रम राबविणे बाबत कार्यवाही करणे.
- पदाधिका-यांचे अभ्यास दौरा कार्यक्रम, पदाधिकारी प्रषिक्षण, बाबत कार्यवाही करणे; षेतकरी प्रषिक्षण /चर्चासत्रे आयोजित करणे बाबत कार्यवाही करणे.
- पणन मंडळ/मा. जिल्हा उपनिबंधक यांनी आयोजित केलेल्या सभांचे विषयसुची प्रमाणे टिपणी तयार करणे. बाजार समिती निवडणुक कार्यक्रम हाताळणे.
विपणन/साख्यिीकी मुख्य बाजार स्थळावरील तथा उपबाजार स्थळावरील सर्व शेतमालाची (धान्य, फळे, भाजीपाला, मिरची, हळद, कापूस, जनावरे, इत्यादि) दैनिक काटापट्टीवरून आवक व बाजार भाव काढणे / संकलित करणे; संबंधीत रजिस्टरमध्ये नोंदविणे, दैनिक, साप्ताहिक, पंधरवाडी, मासिक व वार्षीक आवक, बाजार भाव, किंमतीचे तक्ते तयार करून संबंधीत खात्यास नियमित सादर करणे; या बाबत इतर खात्याचे मागणीनुसार आवश्यक ती माहिती पुरविणे इंन्टरनेटवरून बाजारपेठांतील माहिती घेणे, प्रोजेक्षन टि.व्ही. वर षेतक-यांचे /व्यापा-यांचे माहिती करिता दाखविणे, या कामी आवश्यक असल्यास, कार्यालयातील संगणक चालकांची प्रथमतः मदत घेणे; तसेच ई-मेल व्दारे शेतमालाची आवक व बाजार भावाची माहिती दररोज पाठविणे पत्रव्यवहार हाताळणे रेकॉर्ड ठेवणे.
- नविन/नुतणीकरण करिता कार्यालयात आलेले अनुज्ञाप्ती अर्जाची छाननी करणे, अर्ज परिपुर्ण असल्यास, संबंधीत अर्जदाराकडे, बाजार समितीचे बाजार फी, इतर काही घेणे नसल्याचे संबंधीत विभागाकडून प्रमाणित केल्यांनतर अनुज्ञाप्ती फी स्विकारणे, त्यावर नियमानुसार निर्धारित मुदतीचे आत, नोटसिटसह मंजुूरी करिता सचिवाकडे सादर करणे. अनुज्ञाप्ती मंजुरी करिता अनुज्ञाप्ती उपसमितीची सभा बोलाविणे व त्या अनुशंगीक पुर्ण कार्यवाही करणे, अनुज्ञाप्ती मंजुरीनंतर संबंधीताना पाठविणे
- अनुज्ञाप्ती संबंधातील सर्व पत्रव्यवहार हाताळणे व रेकॉर्ड ठेवणे; अनुज्ञाप्तीधारकाचे करारनामा व जामिनपत्र इत्यादि दस्तऐवजावर सचिव/ सहाय्यक सचिव यांचे समक्ष संबंधीतांची सही होणे आवश्यक आहे.
- अनुज्ञाप्तीची नोंद घेणे; अनुज्ञाप्ती संबंधी वसुली केलेल्या सर्व रक्कमा (अनुज्ञाप्ती फी, गोदाम नोंदणी फी, दुसरी प्रत फी, अनुज्ञाप्ती नुतणीकरण फी विलंब शुल्क व इतर) लेखा विभागाकडे जमा करणे. अनुज्ञाप्ती बाबतची कार्यवाही मुदतीचे आंत पुर्ण करण्याची जबाबदारी संबंधीताची राहील.
- प्रत्येक वर्षी कर्मचा-यांचे कामाचे मुल्यांकन करूण सि.आर. फार्म लिहीने.
- आवश्यकते नुसार सेवक उपसमितीची सभा घेवुन कर्मचा-यांचे कामकाजा बाबत चर्चा करणे. व त्यांचे सि. आर. फार्म सभेत ठेवणे.
- सेवक उपसमिती सभावृत्त लिहिणे व ते कार्यकारी मंडळाचे सभेत मंजुर करूण त्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करणे.
- स्थाई व अस्थाई्र कर्मचा-यांचे नेमणूकी संबंधी सेवानियम, खात्याचे आदेष, परिपत्रकानुसार कार्यवाही करणे, कर्मचा-यांच्या रजा आकारणे, किरकोळ रजेची नोंद ठेवणे, कर्मचा-यांच्या वैयक्तीक फाईल ठेवणे; रजा मंजुरीकरीता नोटसिट चालविणे, रजा मंजुरी आदेश काढणे, देय झालेली वेतनवाढ मंजुरी बाबत कार्यवाही करणे, व त्या संबंधाने आदेश काढणे; रजेची नोंद तथा कर्मचा-यांच्या कार्यकाळातील घटनांच्या /बदलांच्या क्रमवार नोंदी सेवापुस्तकात अद्यावत घेणे; स्थाई/अस्थाई/हंगामी कर्मचारी, नियुक्ती/पदोन्नती संबंधीचे पुर्वपरवानगीचे प्रस्ताव,तसेचआवक्तेनुसार कर्मचा-यांचे वेतननिश्चितीचे प्रस्ताव, खात्याचे प्राधिकृत अधिका-याकडे मंजुरी करीता पाठविणे व त्यासंबंधीचा पाठपुरावा करणे;
- खात्याचे आदेश/परिपत्रकानुसार सेवा नियम दुरूस्ती प्रकरणे मंजुरीकरीता पाठविणे.
- अद्यावत सेवानियमावली ठेवणे; कर्मचा-यांसंबधीचे वा आस्थापना संबंधीचे शासनाचे पणन विभाग/सहकार विभाग /इतर विभागाकडून प्राप्त झालेले आदेश/परिपत्रके संकलित करून ठेवणे.
- कार्यालयीन कामकाजाचे आदेश काढणे; कर्मचारी बदली आदेश काढणे; कर्मचा-यांचे कामकाजा संबंधाने सचिवाचे सुचनेनुसार कर्मचा-यांची सभा बोलाविणे; कर्मचा-यांचे सेवा निवृत्ती वेतना संबंधीची माहिती, संबंधीत कार्यालयाला पाठविणे
- सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-याचे सेवा निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव तयार करून मंजुरीकरिता पाठविणे व त्या संबंधी आवश्यक तो पाठपुरावा करणे
- स्थाई /अस्थाई कर्मचा-यांची हजेरी ठेवणे व त्याप्रमाणे अस्थाई कर्मचा-यांची मजुरी बिले तयार करून मंजुरी घेणे (मुख्यालय व सर्व उपबाजार सहीत)
- रोस्टर बिंदुनामावली अद्यावत करूण घेणे.
- मुख्य बाजारातील तथा उपबाजारातील चालू असलेल्या सर्व बांधकामावर पाहणी करणे; कॉन्टक्टरची बिले आर्किटेक्टचे योग्य त्या शिफारसीप्रमाणे अदा करणे बाबत नोटसिटसह सादर करणे; आर्किटेक्टची बिले अदा करणे बाबत कार्यवाही करणे; बांधकाम खर्चाचा हिशोब ठेवणे; बांधकामाचे मंजुर खर्चमर्यादेचे तुलनेत प्रत्यक्ष होत असलेल्या बांधकाम खर्चाचा वेळोवेळी अहवाल सादर करणे.
- सचिवांचे सुचनेनुसार / सल्यानुसार करावयाचे बांधकामाची नोटसिट सादर करणे.
- आर्किटेक्टकडून नियोजित बांधकामाचे प्लॅन व इस्टिमेटस् तयार करून घेणे.
- आवश्यक्तेनुसार सचिवाचे सुचनेनुसार बांधकाम उपसमितीची सभा बोलाविणे संबंधीची कार्यवाही करणे; सभेत विशयांकित कागदपत्रे सचिवाकडे सादर करणे, करावयाचे बांधकामास 12 (1) चे तरतुदीरुसार खात्याकडून तसेच नगर परिशद/ ग्रामपंचायत कडून मंजुरी घेणे बाबत आवश्यक ते प्रस्ताव पाठविणे, त्या संबधी पाठपुरावा करणे; बांधकामाकरिता कर्ज मागणी प्रस्ताव सादर करणे व पाठपुरावा करणे; कलम 12 (1) चे मंजुरी प्राप्त असलेली, करावयाचे बांधकामाचे निवीदापत्र, आर्किटेक्टचे सल्याने /सहाय्याने तयार करणे, सचिवाचे सल्याने बांधकामाची जाहिरात देणे, ई-निविदा बोलविणे इत्यादि कामाबाबत नोटसिट लिहीणे व कार्यवाही करणे.
- बाजार समितीच्या जुन्या इमारती ज्या दुरूस्तीवर आलेल्या आहे, त्याची नियमानुसार टिपणी लिहुन सदर इमारतीची डागडुगी व दुरूस्ती करून घेणे.
- कलम 57 अंतर्गत न्यायाधिकारणाची प्रकरणे हाताळणे
- दिवानी /फौजदारी/कामगार न्यायालयातील दाखल असलेली सर्व प्रकरणे हाताळणे; यांसंबंधाने वकीलांना आवष्यक ती सर्व माहिती व कागदपत्रे पुरविणे संबंधीत केसेसचे सर्व पेशीवर हजर राहणे. पेषीची माहिती ठेवणे.
- वकीलांचे बिले अदा करणे बाबत कार्यवाही करणे, या बाबतची सर्व माहिती वेळोवेळी सचिवांना देणे.
केंद्र शासनाच्या राश्ट्रिय कृषि बाजार (ई-नाम) योजने अंतर्गत लिलाव करण्यात येणा-या शेतमालाची व येणा-या शेतक-यांची ई-पोर्टलवर नोंदनी करणे, गेट एन्ट्री करणे, शेतमालाचे ग्रेडिंग करणे, शेतमालाचा ई-ऑक्शन करणे, सेल अॅग्रिमेंट, सेल बिल, ऑनलाईन पेमेंट करणे, इ. कामे करणे. संबधित सर्व रेकॉर्ड ठेवणे व या बाबतची सर्व माहिती वेळोवेळी सचिवांना देणे.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे रामनगर मार्केट यार्डवर पि.एस.एफ. योजने अंतर्गत एफ.सि.आय. तसेच शासनाचे नाफेड या योजनेअंतर्गत सोयाबिन, चना, तुर, व धान या शेतमालाची हमीभावाने खरेदी आहे. त्या अंतर्गत येणारी कामे करणे, (ऑनलाईन नोंदणी करणे, शेतक-यांना शेतमाल विक्रीस आणने बाबतची दिनांक चा संदेश मोबाईलद्वारा देणे, शेतमालाची ग्रेंडिग करणे, योग्य तोच म्हणजे ,एफएक्यु दर्जाच्या शेतमालाचा काटा करणे, इ. ) सदर खरेदी बाबत रेकॉर्ड ठेवणे. व या बाबतची सर्व माहिती वेळोवेळी सचिवांना देणे.
- शेतमाल तारणे योजनेचे प्रस्ताव तयार करून पाठविणे; मंजुर आदेशातील मार्गदर्शक सुचनेनुसार तारण योजनेत आलेला शेतमाल स्विकारणे; शेतमालाचे दर्जा/योग्यते नुसार त्यास ग्रेड लावणे; मोजमाप करून घेणे; पोत्यावर लॉट नंबर लिहीणे; ग्रेड प्रमाणे मालाची थप्पी लावून घेणे; नंतर चालू बाजार भावाप्रमाणे शेतमालाची किंमत लावणे; नियमानुसार मालाचे पेरेपत्रकासह 7/12, आवष्यक नमुन्यामध्ये अर्ज; करारनामा व इतर माहिती शेतक-यांकडून घेणे; तारण कर्जाचे धनादेश तयार करणे; त्यावर कार्यालयीन मंजुरी घेणे; धनादेश शेतक-यांना देणे
- तारण मधील शेमालाचा सर्व हिषोब ठेवणे; आवश्यक ते सर्व रजिस्टर ठेवणे; दैनिक स्टॅकची नोंद घेणे; तसेच उपबाजारपेठांवरील तारणयोजनेत स्विकारलेल्या शेतमालाचा अहवाल मागविणे.
- साप्ताहिक माहिती तक्ते पणन मंडळास /मा.जि.उ.नि. कार्यालयास सादर करणे; पणन मंडळाकडून तारण कर्ज हप्त्याची मागणी करणे
- तपासणी अधिका-यांना रेकॉर्ड दाखविणे;स्टॉक दाखविणे;योजनेची प्रसिध्दी करणे; शेतक-यांना माहिती समजावून सांगणे; हया व्यतिरिक्त शेतमालाची साठवणूक, जोपासना योग्य प्रकारे करणे; योग्य वेळी धुरीकरण करणे; दैनिक किर्द लिहणे.
- हमाल, मापारी हयांची हमाली व मापाईचे बिले देणे. बारदान्याचा हिशोब ठेवणे, व तारण योजने संबंधीची इतर सर्व अनुशंगीक कामे सांभाळणे. तारण योजनेची प्रसिध्दी करणे, प्रचार करणे व शेतक-यांना सदर योजने बाबत गावोगावी जाऊन माहिती देणे.
- मार्केट यार्डवरील सर्व गोदामे/ गोदामातील गाळयांचे /तसेच किरकोळ व्यवसायीकांना (चहा, पान, हॉटेल इ. चा व्यवसाय करणा-यांकडून), व्यवसायाकरीता दिलेल्या खाली जागेचे भाडे आकारणे, वसूल करणे; गोदामाचे/गाळयांचे/खाली जागेचे भाडयाचे करारनामे वेळेवर करणे, (मासिक/वार्षीक भाडयाने दिलेले असो किंवा भोगवटा हक्काने दिलेले असो)
- इमारतीची देखभाल ठेवणे व मेंन्टनन्स व दुरूस्तीचे चे कामे करणे इमारतीचा विमा काढणे, मेन्टनन्स खर्च वसुल करणे
- मार्केट यार्डवरील संपुर्ण गाळयाचे/दुकानाचे करारनामे करणे, मासिक भाडे आकारणे, विद्युत बिल वसुल करणे, लिजचे भाडे वसूल करणे; वसुलीचा आढावा सचिवांना सादर करणे.